भाजपा गुंडांना पवित्र करण्याच काम करत आहे - शरद पवार

By Admin | Updated: February 4, 2017 22:31 IST2017-02-04T22:31:57+5:302017-02-04T22:31:57+5:30

मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. पण तुम्ही सुद्धा 25 वर्ष शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसला होता.

BJP is working to sanctify the goons - Sharad Pawar | भाजपा गुंडांना पवित्र करण्याच काम करत आहे - शरद पवार

भाजपा गुंडांना पवित्र करण्याच काम करत आहे - शरद पवार

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 4 - मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. पण तुम्ही सुद्धा 25 वर्ष शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसला होता. त्यामुळे मुंबईत महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्याला भाजपाही तितकीच जबाबदार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना, भाजपावर टीका केली. 
 
मुंबईत मानखुर्दमध्ये सभा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. निवडणूका जिंकण्यासाठी भाजपाकडून सध्या पक्षामध्ये सरसकट सर्वांना प्रवेश दिला जातोय. यामध्ये अनेक गुंड सुद्धा आहेत. 
 
याच मुद्दावरुन शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. गुंडांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना पवित्र करण्याच काम देवेंद्रभाई करत आहेत असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. इतकीवर्ष सत्ता हाती असूनही शिवसेना-भाजपाला खड्डे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत. 
 
नवीमुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या महापालिकांमधला राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार पाहा असे पवार म्हणाले. मोठया विश्वासाने लोकांनी परिवर्तनासाठी मोदींच्या हाती सत्ता दिली पण काहीही बदल घडलेला नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणूका आहेत त्या राज्यांमध्ये भाजपाचा पराभव होईल असे पवार म्हणाले. 
 

Web Title: BJP is working to sanctify the goons - Sharad Pawar