शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

राणे, गोयल, मुनगंटीवार, महाजनांना लोकसभेच्या मैदानात उतरविणार; गडकरींना नाही?

By यदू जोशी | Published: February 25, 2024 7:19 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती...

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभेच्या रिंगणात  काही मंत्र्यांना उतरविण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पीयूष गोयल, राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नावांची चर्चा आहे. 

राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून मैदानात उतरविण्याची चर्चा आहे. ते  मंत्री असले तरी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. राज्यसभेसाठी त्यांना संधी दिली नाही, तेव्हाच ते लोकसभा लढणार, अशी चर्चा सुरू झाली होती. 

मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये, तर छ. संभाजीनगरला कोण?सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जाते. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. धानोरकर यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यानंतर तेथे पोटनिवडणूक झाली नाही. आताच्या निवडणुकीत धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस संधी देईल, अशी जोरदार चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव ‘एमआयएम’चे इम्तियाज जलिल यांनी केला होता. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्याला द्यावी, अशी भाजपची इच्छा असल्याचे सांगण्यात येते. तेथे अतुल सावे वा केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यापैकी एक उमेदवार असेल, असे मानले जाते. 

नितीन गडकरींना नागपुरात पुन्हा संधी

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा असली, तरी त्यांनाच पुन्हा संधी मिळेल,हे नक्की आहे. 
  • रावसाहेब दानवे यांना जालन्यातून पुन्हा संधी द्यायची की त्यांच्या मुलाला, याबाबत विचार करत आहे.  
  • जळगाव लोकसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लढविण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. 
  • विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून, तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर-मध्य मुंबई किंवा उत्तर मुंबईतून लढविले जाऊ शकते. 
टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाlok sabhaलोकसभा