महापालिका निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल- दानवे
By Admin | Updated: February 5, 2017 18:59 IST2017-02-05T18:59:15+5:302017-02-05T18:59:15+5:30
महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपा सर्वाधिक यश मिळवून नंबर वन पार्टी असेल, असा विश्वास

महापालिका निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल- दानवे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्षपदे व सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर राहिली त्याचप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपा सर्वाधिक यश मिळवून नंबर वन पार्टी असेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केला.
राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. त्याचप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा नंबर वन ठरेल. निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले पण युती करणार नाही अशी एकतर्फी घोषणा शिवसेनेनी केली असं म्हणत दानवेंनी शिवसेनेचाही समाचार घेतला.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांना त्यांनी शपथ दिली व प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. मुंबई महापालिकेत भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेना व काँग्रेस पक्षाने छुपी युती केल्याचा आरोप शेलार यांनी केला.