शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

Maharashtra Political Crisis: “केवळ धनुष्यबाण चिन्हावर नाही, तर शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार, कारण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 19:41 IST

Maharashtra Political Crisis: संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्ष नाही. वरून कीर्तन खालून तमाशा हे उद्धव ठाकरेंसाठी लागू होते, अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांच्या सुनावणीला आता पुढची तारीख मिळाली आहे. यातच आता भाजपने यावर प्रतिक्रिया देत, एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे गेल्यासंदर्भात आता आरोप-प्रत्यारोप होत असून, शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेतेही यावर भाष्य करताना दिसत आहेत. भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यावर बोलताना, मला वाटते की, एकनाथ शिंदे यांचाच शिवसेनेवर हक्क आहे. कारण त्यांच्याकडे ४० आमदार आहेत. संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्षाचे तसे नसते पक्षावर कार्यकर्त्यांचाच हक्क असतो, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहतो

कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहातो, त्यामुळे पक्षावर पहिला हक्क हा कार्यकर्त्यांचा असतो. ४० आमदारांनी हिंदूत्त्वाचा विचार केला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मिळवलेल्या सत्तेला लाथ मारली. मात्र, अजूनही काही लोक खुर्चीच्या प्रेमात आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, शिवसेनेने अमित शाहांवर केलेल्या टीकेवर पलटवार करताना, वरून कीर्तन खालून तमाशा हे वक्तव्य अमित शाह यांच्यासाठी नाही तर उद्धव ठाकरेंसाठी लागू होते, अशी बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली. विजयादशमी हा आनंद वाटण्याचा दिवस आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी वाद नको म्हणून मैदान यांनाही नको आणि त्यानांही नको, यातून कदाचीत हा वाद निकाली निघू शकतो. मात्र याबाबत मनापाने निर्णय घ्यायचा आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे