शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

“हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य, देश असो वा राज्य उद्धव ठाकरेंची दारुण अवस्था झाली आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:32 IST

उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे हिंदुत्वाचे समर्पण केले, अशी टीका करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar Vs Uddhav Thackeray: महाबैठकीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाग घेतला. बैठक चांगली राहिली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास विरोधकांच्या पाटणा येथील बैठकीत व्यक्त करण्यात आला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सामील झाले होते. यावरून आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत, या शब्दांत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि जगात देशाचा गौरव वाढवत आहेत. मात्र पाटण्यातील सर्व विरोधकांना स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने ते एकत्र आले आहेत, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच विरोधकांची पाटणा येथील एकजुटीची बैठक म्हणजे कुठलाही विचार नसलेली गोष्ट आहे. ही बैठक म्हणजे इंजिन विना गाडी आणि आत्म्या विना शरीर असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

देश असो वा राज्य उद्धव ठाकरेंची दारुण अवस्था झाली आहे

उद्धव ठाकरे आता हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांनी हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे हिंदुत्वाचे समर्पण केले आहे. देश असो वा राज्य उद्धव ठाकरे यांची अवस्था दारुण झाली आहे, अशी बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या दहाहून अधिक मुख्यमंत्री स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत. दहाच काय राज्यात शंभर मुख्यमंत्री असावेत. स्वप्न पाहण्याला घटनेत कुठलीही मनाई नाही. मात्र या सर्व भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनात काय आहे हे बॅनरद्वारे सांगावे. यासोबतच या सर्वांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण करावे हे महत्त्वाचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे