शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख, व्हिडीओ व्हायरल करत राष्ट्रवादीचा पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:24 IST

Chandrashekhar Bavankule: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा औरंगजेब याचा आदरार्थी उल्लेख करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

मुंबई - महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे. त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं विधान केल्याने त्यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. तर राष्ट्रवादीचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असा उल्लेख केल्याने हा वादा आणखी पेटला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनहीभाजपावर जोरदार पलटवार करण्यात आला असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा औरंगजेब याचा आदरार्थी उल्लेख करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगजेब बादशाहचा उल्लेख औरंगजेबजी असा करताना दिसत आहेत. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात की, ‘’क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिलल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?’’ असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे. 

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर आपण ठाम असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. 'स्वराज्यरक्षक' ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस