भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक अमरावतीमध्ये

By Admin | Updated: September 27, 2016 02:33 IST2016-09-27T02:33:58+5:302016-09-27T02:33:58+5:30

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ५ आणि ६ आॅक्टोबरला अमरावती येथे होणार आहे. मराठा समाजाच्या मोर्चावरून वातावरण ढवळून निघालेले असताना होत असलेल्या

BJP state executive meeting in Amravati | भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक अमरावतीमध्ये

भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक अमरावतीमध्ये

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ५ आणि ६ आॅक्टोबरला अमरावती येथे होणार आहे. मराठा समाजाच्या मोर्चावरून वातावरण ढवळून निघालेले असताना होत असलेल्या या बैठकीत भाजपा काय भूमिका घेते या बाबत उत्सुकता असेल. आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. वर्षाअखेर होत असलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर प्रामुख्याने चर्चा होईल. यंदाचे वर्ष हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष असून समाजातील शेवटच्या माणसाशी निगडित कार्यक्रम राबविण्याचे भाजपाने ठरविले आहे. त्या दृष्टीने अमरावतीच्या बैठकीत ठोस असा कार्यक्रम निश्चित होईल, असे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: BJP state executive meeting in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.