"राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये"; केशव उपाध्ये यांचा टोला

By देवेश फडके | Published: January 29, 2021 07:05 PM2021-01-29T19:05:45+5:302021-01-29T19:09:25+5:30

काँग्रेस प्रवक्ते यांनी राम मंदिर निधीबाबत घेतलेल्या शंकेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

bjp spoke parson keshav upadhye criticize sachin sawant over ram mandir donation | "राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये"; केशव उपाध्ये यांचा टोला

"राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये"; केशव उपाध्ये यांचा टोला

Next
ठळक मुद्देसचिन सावंत यांना केशव उपाध्ये यांचे प्रत्युत्तरराम मंदिर निधी संकलनावर सचिन सावंत यांनी घेतली होती शंकाराम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये; केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे, याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसनेराम मंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे लगावला आहे.  

"मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही; झेंडा बदलणाऱ्यांबद्दल काय बोलणार"


काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राम मंदिर निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शंका घेत हा निधी योग्य ठिकाणीच जाईल, याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, असे एक पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपाध्ये  यांनी म्हटले आहे की, राम मंदिरासाठी सामान्य माणूस  स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही, याची चिंता काँग्रेस पक्षाला वाटू लागली आहे. राम मंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणाऱ्याकडे सुपूर्त करीत आहेत. निधी संकलन करणाऱ्या संघटनांवर विश्वास असल्याने गोरगरिबही निधी संकलनास  हातभार लावत आहेत, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड  गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राम मंदिराचा निधी  नॅशनल हेराल्ड प्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे, असेही उपाध्ये  यांनी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. पण या ट्रस्टबरोबरच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भाजप, संघाची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता आहे. हा पैसा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठी आपला निधी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल, याची खबरदारी घ्यावी. तसेच आतापर्यंत भाजप, संघामार्फत गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजप, संघाने पोहोचवला की नाही, याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

Web Title: bjp spoke parson keshav upadhye criticize sachin sawant over ram mandir donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.