भाजपाने आम्हाला दडपू नये
By Admin | Updated: November 15, 2014 01:49 IST2014-11-15T01:49:28+5:302014-11-15T01:49:28+5:30
भाजपावर विश्वास ठेऊन चालणार नाही, ते तुम्हाला जागा सोडणार नाहीत. स्वत:च्या हिमतीवरच तुम्हाला निवडून यावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकत्र्याना केले.

भाजपाने आम्हाला दडपू नये
पुणो : भाजपाने आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करू नये, तसा प्रयत्न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपावर विश्वास ठेऊन चालणार नाही, ते तुम्हाला जागा सोडणार नाहीत. स्वत:च्या हिमतीवरच तुम्हाला निवडून यावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकत्र्याना केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचा व पक्षाकडून निवडणूक लढलेल्या उमेदवारांच्या सत्काराचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, आम्ही भाजपाकडे भीक मागणार नाही. उद्धव ठाकरे
यांना त्यांनी जसा दाबण्याचा प्रयत्न केला, तसे ते आपल्याबाबत करू शकणार नाहीत. त्यांनी सन्मान
दिला नाही तर पुन्हा आमचा मार्ग मोकळा आहे. पण देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे.
मला दिल्लीतच जायचे आहे, त्यामुळे राहुल कुल यांना मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला आहे, असे जानकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.