भाजपाने आश्वासने पाळावी, अन्यथा..

By Admin | Updated: October 28, 2014 01:22 IST2014-10-28T01:22:03+5:302014-10-28T01:22:03+5:30

पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत.

BJP should make promises, otherwise .. | भाजपाने आश्वासने पाळावी, अन्यथा..

भाजपाने आश्वासने पाळावी, अन्यथा..

पुणो : पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत. तो करारनामा पाळला नाही, तर मी तो उघडकीस आणोन, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.
शेट्टी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीनंतर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाचा एकही उमेदवार निवडून न येण्यामागची कारणो देताना ते म्हणाले, आम्ही भाजपाला मते मिळवून दिली, पण आमचे उमेदवार निवडून आणू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जनतेला कदाचित आम्ही मोर्चे काढणो, आंदोलने करणोच अपेक्षित असावे. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने आम्हा घटक पक्षांवर टोकाची टीका केली. त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले नाही. त्याचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला, असे ते म्हणाले.
भाजपाला राष्ट्रवादीनेही पा¨ठबा देऊ केला आहे, असे निदर्शनास आणून दिल्यावर शेट्टी म्हणाले, घोटाळेबाजांना सरकारने संरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे. आम्ही राष्ट्रवादीशी पूर्वीही लढत होतो, आताही लढू. भाजपने कोणती लेखी आश्वासने दिली आहेत ते योग्य वेळी जाहीर करेन, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
वायदेबाजाराकडून साखर भावाबाबत घबराट
गाळप हंगामापूर्वी वायदेबाजाराकडून घबराट निर्माण केली जाते.भाव कमी झाले तरी ग्राहकांना कमी भावात साखर मिळत नाही. रेशनवरील लेव्ही साखरेसाठी ¨क्वटलला 32क्क् रूपये दर केंद्राने जाहीर केला आहे. त्यातून 22 ते 25 लाख ¨क्वटलसाठी हमखास ग्राहक असताना भाव पाडले जातात, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला.

 

Web Title: BJP should make promises, otherwise ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.