शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:01 IST

योजनांच्या लाभार्थींना भाजपचे सभासद करा 

कोल्हापूर : पुढील पंधरा वर्षे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत राहण्यासाठी आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये भाजपचीच सत्ता येण्यासाठी राज्यात १ कोटी ५१ लाख भाजपचे सभासद होणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यातील लाडकी बहीण योजनेचे २ कोटी २० लाख तर मोफत विजेच्या ४० लाख कृषी पंपधारकांना भाजपचे सभासद करून घ्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले.भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यशाळा झाली.मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यात आतापर्यंत भाजप सदस्य नोंदणीत पश्चिम महाराष्ट्रातील योगदान मोठे आहे. आतापर्यंत राज्यात १ कोटी १६ लाख भाजप सदस्यांची नोंदणी झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ५१ लाखापर्यंतचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण आणि मोफत कृषी पंप योजनेतील लाभार्थींनाही सभासद करून घ्यावे. राज्यात भाजपचे अधिकाधिक सभासद झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत १३ हजार जणांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल. राज्यातील सर्व ३६ जिल्हा परिषद आणि २७ महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेElectionनिवडणूक 2024