शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

भाजपा-शिवसेनेच्या लव्हस्टोरीने रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:18 IST

लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले)ने मुंबईतील एक आणि शिर्डी अथवा सोलापूरची जागा भाजपा-शिवसेनेकडे मागितली होती. मात्र, आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा संधी दिली जाईल, या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आली.

- योगेश बिडवईमुंबई : गेली साडेचार वर्षे एकमेकांना पाण्यात पाहाणाऱ्या भाजपा-शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सूत जमल्याने जागावाटपात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं)ला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले)ने मुंबईतील एक आणि शिर्डी अथवा सोलापूरची जागा भाजपा-शिवसेनेकडे मागितली होती. मात्र, आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा संधी दिली जाईल, या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आली. पहिल्यांदाच रिपाइं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे आणि पक्ष म्हणून अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही बाब चांगली नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सेना-भाजपाने आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून त्यांना प्रचारात सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीचा मेळावा झाला. मात्र बॅनरवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. शिवाय, नाशिक येथे झालेल्या बैठकीतही ते सहभागी झाले नाहीत.कल्याण येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी सेना-भाजपाच्या मंत्र्यांसमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली. रिपाइंमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. तुम्ही आमदार, मंत्री झालात. मात्र रिपाइंच्या कार्यकर्त्यांना एखाद्या कमिटीवरही घेतले नाही. भाजपाला आमची गरज नसेल, तर विरोधात काम करून ताकद दाखवून देऊ, असा इशारा रिपाइंचे रामनाथ शेजवळ यांनी दिला.आमचे नेते रामदास आठवले यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतरच आम्ही कोल्हापूरच्या सभेत सहभागी झालो. कार्यकर्त्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी जाहीरपणे न मांडता वरिष्ठ पातळीवर आमच्याकडे मांडाव्यात. त्यांचे म्हणणे रास्त आहे. त्यावर मार्ग काढू.- अविनाश महातेकर,राज्य अध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा