शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार, रावसाहेब दानवेंकडून युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:44 IST

भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

 अमरावती - नशिबावर कोणताच पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही. ज्या पक्षाजवळ संघटन त्यांचीच सरशी होण्याचा हा काळ आहे. पक्षाद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाल्याने भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २७ आॅक्टोबरपासून ४८ मतदारसंघात कार्यकर्त्यांना कामाला लावायला लावण्यासाठी जिल्हानिहाय दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले. लाट होती म्हणून पराभव झाल्याचे विरोधक सांगत असले तरी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात, देशात सत्ता असली की पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होते. मात्र, भाजपाची संघटनात्मक वाटचालदेखील तेवढ्याच सक्षमपणे सुरू असल्याचे दानवे म्हणाले. विधानसभेसाठी २८८ विस्तारक पूर्णवेळ काम करीत आहेत. याव्यतिरीक्त ४८ विस्तारक स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. यापैकी ८८ हजार बुथपर्यंत आम्ही वॉररूमच्या माध्यमातून पोहोचलो असल्याचे दानवे म्हणाले. पत्रपरिषदेला आ. अरूण अडसड, आ. सुनील देशमुख, आ, अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ, रामदास आंबटकर, प्रदेश सचिव निवेदिता चौधरी (दिघडे), प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदी उपस्थित होते.

 दिवाळीनंतर नाफेडची खरेदी सुरू युतीची चर्चा झाली नसली तरी मित्रपक्ष शिवसेना सोबतच राहावी, असा आमचा प्रयत्न आहे. अमरावती येथे संघटनात्मक आढावा घेत आहो. आमचे काम वाढले तरी युती झाल्यास याचा मित्रपक्षालाच फायदा होईल. कर्जमाफीसाठी व्यक्ती हा घटक गृहीत न धरता कुटुंब हा घटक गृहीत धरण्यात येत असल्याने अधिकाधिक शेतक-यांना याचा लाभ होणार आहे. ९९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. दिवाळी पश्चात सोयाबीनची नाफेड खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही, रावसाहेब दानवे यांनी दिली.

 अमरावतीचा उमेदवार संसदीय बोर्ड ठरविणार अमरावती लोकसभा शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजपाच्या उमेदवार  सीमा सावळे असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केल्याची विचारणा केली असता दानवे म्हणाले, भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. केंद्रीय पार्लमेंट्री समिती उमेदवार निश्चित करते. राममंदीराचा मुद्दा शिवसेनेने हायजॅक केला काय, अशी विचारणा केली असता, याविषयी शिवसेनेचे आम्ही स्वागतच करतो. राफेलचा करार काँग्रेसच्या काळात जाला अम्ही कमी दराने केला असल्याचे दानवे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे