आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा तयारी सैराट

By Admin | Updated: September 3, 2016 21:45 IST2016-09-03T21:45:45+5:302016-09-03T21:45:45+5:30

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरु आहे

BJP ready for upcoming municipal polls: Sairaat | आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा तयारी सैराट

आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा तयारी सैराट

>- मनोहर कुंभेजकर / ऑनलाइन लोकमत
बाटी चोखा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी साधला भोजपूरी भाषेत उत्तर भारतीयांशी संवाद 
 
मुंबई, दि. 3 - आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरु आहे.पालिका निवडणुकीत शिवसेना -भाजपा युती होणार नाही हे गृहीत धरुन मुंबई भाजपाने पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.सध्या पालिकेत भाजपाचे ३१ नगरसेवक असून भाजपाला एकहाती सत्ता हवी आहे.मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात षण्मुखानंद येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी ११४ नगरसेवक कसे निवडून येतील याकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेऊन जोमाने कामाला लागा असे आवाहन केले होते. 
 
आता त्यासाठी सर्व जाती धर्माच्या मतदारांशी थेट संपर्क भाजपाने सुरु केला आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस हे देखिल मुंबई भाजपाच्या विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र आहे.यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यानी पश्चिम उपनगरला क्वचितच भेट दिली असेल,परंतू मुंख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी आतापर्यंत किमान १५ ते २० वेळा पश्चिम उपनगरातील भाजपाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढवला असल्याचे पश्चिम उपनगरातले चित्र आहे. 
 
मुंबईत मोठ्या प्रमाणात गुण्या गोंविदाने राहणा~या उत्तर भारतीयांना मुंबईतुन कदापी हद्दपार करणार नाही.ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मुंबई भाजपातर्फे गोरेगाव(पूर्व)येथील एनएससी संकुलात उत्तर भारतीयांसाठी आयोजित केलेल्या "बाटी चोखा संवाद कार्यक्रमात केले.मुंबईत प्रथमच उत्तर प्रदेशांत प्रसिध्द असलेल्या बाटी चोखा खात या सभेला मोठ्यासंख्येने उपस्थित असलेल्या मुंबईत राहात असलेल्या उत्तर भारतीय भोजपुरी भाषेत नागरिकांशी शेर शायरी मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधला.आणि मंचकावर उपस्थित असलेल्या सुमारे १२ भाजपाच्या उत्तर भारतीय नेत्यांची त्यांनी मंचकावर नावे देऊन त्यांना जिंकून घेतले.मुंबईत असलेल्या ४० लाख उत्तर भारतीयांनाच्या मतांवर डोळा ठेवून स्वयंबळावर पालिका निवडणूकीत विजय मिळविण्याचे रणशिंग भाजपाने फूकल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला मुंबईतील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.यामध्ये महिलांही मोठ्या प्रमाणात दिसून आल्या.कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाला उत्तर भारतातील गमश्या बांधण्यात आले होते. 
 
महाराष्ट आणि उत्तर प्रदेशाचे जुने नाते नाते आहे.उत्तर प्रदेशातुन आलेल्या प्रभू रामचंद्रांचे याच महाराष्टाने स्वागत केले होते आणि आजही .हीच परंपरा महाराष्टात आजही सुरूच आहे.मुंबईने देशातील अनेकांना मोठे केले.अमिताभ बच्चनही याच मुबईतून सुपरस्टार झाला असून आजही मुंबईच्या विकासासाठी धावू येत आहेत.भाषा,प्रांतवर लढले तर आमचे नुकसान होईल असा भावनिक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना-मनसेला मारला.
 
महाराष्ट्राच्या इतिसातील प्रथमच असा मुख्यमंत्री असेल की,जो मुंबईत उत्तर भारतीयांशी बाटी चोखा खात संवाद करत आहे.काॅग्रेसच्या काळात मुंबईतील उत्तर भारतीय लोकांवर सतत अत्याचार झाले.परंतु केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून मुंबईतील एकही उत्तर भारतीयांवर हल्ला झालेला नाही.यामुळे भाजपाच्या राज्यात मुंबईतील उत्तर भारतीय सुरक्षित आहे.मुंबई महापालिकेत भाजपाला एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे.यामुळै तुमच्या सर्वांची साथ हवी आहे असे आवाहन करत मुंबई भाजपा अध्यक्ष -आमदार श्री.आशिष शेलार यांनी उत्तर भारतीयांना मुंबई महापालिकैची निवडणूक डोळ्यासमौर ठेवूनच प्रत्येक मुद्याला हात घातला.उत्तर प्रदेशांतून १८००ते १९०० किलो मीटरपासून दुर खेड्यातुन आलेल्या उत्तर भारतीयांनी मुंबईत महत्वाचे योगदान दिले.यावेळी खासदार गोपाळ शेट्टी,मुंबई भाजपा अध्यक्ष -आमदार आशिष शेलार,महिला बालविकास राज्य मंत्री विद्या ठाकूर,आमदार भाई गिरकर,मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजित मिश्र,उत्तर भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कुंभोज,प्रेम शुक्ला आदीं मान्यवर उपस्थिती होते. 
 

Web Title: BJP ready for upcoming municipal polls: Sairaat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.