शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “अमेठीचा करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, आता टार्गेट शरद पवारांचे बारामती”; भाजपचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 22:08 IST

Maharashtra Political Crisis: कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे, यादृष्टीने भाजपचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, अनेक केंद्रीयमंत्री कामाला लागले आहेत. भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम हुकला. मात्र, आता पुढील लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू, असा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

गेल्यावेळी बारामतीचा  कार्यक्रम थोडक्यात हुकला, अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती आहे असे भाजप नेते राम शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम शिंदे भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. मागील दोन महिन्यात कोणाकोणाला नोटीस आल्या यावरून तुम्हाला कळाले असेलच की ही निवडणूक किती सीरियस लढणार आहे की नाही. काहींच्या  चेहऱ्याकडे बघितले की लगेच लक्षात येते, नाव घ्यावे लागत नाही, असा खोचक टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला.

कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे

कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे. A म्हटले की अमेठी आणि B म्हटले की बारामती. A चा कार्यक्रम २०१९ ला केला. २०१९ ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो आता २०२४ ला करायचा आहे. त्याच्यासाठीच १७ महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. हे नियोजन साधे नसून, या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार असल्याने भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येते, असे राम शिंदे म्हणाले. 

दरम्यान, दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असे सूचक विधानही राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRam Shindeराम शिंदेBaramatiबारामतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक