शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Ram Kadam : "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"; भाजपाचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 15:37 IST

BJP Ram Kadam slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. याच दरम्यान आता भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 

"दसरा मेळाव्यासाठी मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?" असा खोचक सवालही भाजपाने विचारला आहे. भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"महत्वपूर्ण... दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचे मैदान  भरावे म्हणून पेंग्विन सेनेने  मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत...  आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजीपार्क मैदान... काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ram Kadamराम कदमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDasaraदसरा