शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याला जायला निघालेले उदयनराजे वाटेतूनच परतले; जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:05 IST

Maratha Reservation Update: मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा केलेल्या उपोषणात उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. यामुळे या वेळीही उदयनराजे भेटायला जात होते.

बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा, असा निर्वाणीचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले त्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. परंतू, ते वाटेतूनच पुन्हा माघारी परतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

उदयनराजे पुण्यात थांबले आहेत. ते जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जायला निघाले होते. राज्य सरकारची आरक्षण उपसमितीसोबत आज बैठक होती. या बैठकीत आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे वाटले होते. परंतू, तसे काहीही झालेले नाहीय. जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे, पण सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा केलेल्या उपोषणात उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. यामुळे या वेळीही उदयनराजे भेटायला जात होते. परंतू, ते पुण्यातच का थांबले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एबीपी माझाने याचे वृत्त दिले आहे. 

आज सकाळी दोनदा वैद्यकीय पथक तपासणी व उपचार देण्यासाठी दाखल झाले. पथकाने विनंती केली असता, तुम्ही खाली व्हा असं म्हणत जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी स्वतःची काळजी घेत उपचार घेण्याचे आवाहन केले. तसेच नवीन पुरावे पुढे येत आहेत, शिंदे समितीला आणखी वेळ लागणार आहे. सरकारला आणखी वेळ देण्यात यावा असेही शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील