शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्या, सर्वेक्षणाचे अहवाल मित्रपक्षाला देणार? युक्तिवादाचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 09:36 IST

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबतच्या युतीत लोकसभेच्या आणखी काही जागा आपल्याला मागून घेता येतील, या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचे मानले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये किमान २२ जागा मागण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या भुवया उंचावल्या आहेत. इतक्या जागा शिंदे गटाला कशा द्यायच्या, अशी कुजबुज भाजपच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी ऐकायला आली. त्यामुळे महाविकास आघाडीप्रमाणेच भाजप-शिंदे सेनेतही जागा वाटपावरून खटके उडणार, अशी चिन्हे आहेत.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला राज्यात तब्बल ४१ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेचे १८ खासदार निवडून गेले होते; मात्र आज त्यातील १३ खासदार शिंदे यांच्याकडे, तर ५ खासदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. अविभाजित शिवसेनेने जिंकलेल्या १८ जागा आम्हीच लढविणार, अशी भूमिका ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती. आता शिंदे गटाने त्याही पुढे जात २२ जागा मागितल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबतच्या युतीत लोकसभेच्या आणखी काही जागा आपल्याला मागून घेता येतील, या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचे मानले जाते. शिंदे गटाला लोकसभेच्या १४ ते १६ जागा द्याव्यात आणि आपण ३२ ते ३४ जागा लढवाव्यात, असा भाजपमध्ये सूर आहे. शिंदे गटाशी चर्चा करताना कोणता युक्तिवाद करायचा, याची पूर्वतयारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी करून ठेवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

...तर शिंदे गटाच्या हाती ‘कमळ’ शिंदे गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत ‘कमळ’ या भाजपच्या चिन्हावर लढतील, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त केली जात होती; मात्र आता शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ हे मूळ चिन्ह मिळाले आहे; परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी कायदेशीर लढाईत शिंदे गटाकडून चिन्ह गेले तर हाती ‘कमळ’ घेण्याचा विचार होऊ शकतो.

भाजपची रणनीती काय?  गेले जवळपास एक वर्ष भाजपकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने निवडणूक सर्वेक्षण करणे सुरू आहे. या सर्वेक्षणात समोर आलेल्या उणिवांवर लगेच उपाययोजना केल्या जात आहेत. 

 शिंदे गटाच्या सध्याच्या १३ खासदारांबाबत; तसेच गेल्यावेळी शिवसेनेने जिंकलेल्या अन्य पाच जागांबाबत सर्वेक्षणांमधून आलेल्या निष्कर्षांची माहिती भाजपकडून शिंदे गटाला प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेवेळी दिली जाईल, अशी माहिती आहे. भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या जागांवर भाजपची नजर असेल, असे मानले जाते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना