शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील"; विखे पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:36 IST

BJP Radhakrishna Vikhe Patil And Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. यानंतर आता भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. 

"मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील" असं म्हणत विखे पाटील यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. तसेच "शिंदे गट आणि भाजपावर आरोप-प्रत्यारोप करणारे  संजय राऊत हे टीकेचे धनी होत आहेत. असं असलं तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या अशा विधानाने पक्ष प्रमुखांवर ही वेळ आली तर आता ते पक्षाचाही निकाल लावत आहेत" असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. 

मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत असली तरी ही टीका विकासकामांसाठी नाहीतर हे सत्ता गेल्यानं आलेलं वैफल्य असल्याचं देखील विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं" असा गंभीर आरोप निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी केला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंनी (Shivsena Uddhav Thackeray) फुटलेला पेपर सोडवला. धनुष्यबाण हे चिन्ह आता उद्धव ठाकरेंना न शोभणारं आहे. गेलेल्या लोकांना गद्दार म्हणून तुम्ही योद्धा होत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच राणेंनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत