शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केलं, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:24 IST

Maharashtra News: पूर्वी भाजपमध्ये साधू-संत दिसत होते. आता संधीसाधू दिसायला लागले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेत केली होती.

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतील गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट, केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर सडकून टीका केली. याला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केले, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का, अशी विचारणा करण्यात आली आहे.  

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी टीकेचा समाचार घेतला आहे. पूर्वी एक जमाना होता, तेव्हा हिंदुत्वाचे पवित्र वातावरण होते. त्यावेळेस भाजपच्या व्यासपीठावर साधू-संत दिसत होते. आता संधीसाधू दिसायला लागले आहेत. हे लोक परिवारवाद, घराणेशाहीवर बोलत असतात. होय, मी उद्धव ठाकरे अभिमानाने सांगतो की, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे की, ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत. आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबत आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला होता. यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पलटवार केला आहे. 

तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?

उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी आमदार केले. तेव्हा तुम्हाला शिवसैनिक आठवला नाही का? त्यामुळे संधीसाधू तुम्ही आहात, असे प्रत्युत्तर विखे-पाटील यांनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे योगदान देश कधीच विसरणार नाही. मात्र सत्तेसाठी हे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेवून बांधले तेच भाजपम नेत्‍यांना संधीसाधू म्‍हणत आहेत, याचे आश्‍चर्य वाटते. भाजपने कधीही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मात्र तुम्ही त्यांच्या विचारांचे आदर्शच खुर्चीसाठी बदलून टाकली, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. 

दरम्यान, राज्यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेवून जाणारे शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. जे जनतेच्या मनात होते तेच घडले. कोणताही निकाल यांच्या बाजूने आला की संस्था चांगली आणि विरोधात गेला की शिमगा करायचा आशी पद्धत सध्या ठाकरे गटाने सुरू केली आहे. मात्र सत्‍याचा स्विकार करण्‍याची मानसिकता ठेवा. राज्यातील जनता सूज्ञ असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना-भाजप सर्वत्र सत्तेवर दिसेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे