भाजपाने खेळले ‘मुंडे’कार्ड

By Admin | Updated: August 19, 2014 00:55 IST2014-08-19T00:55:20+5:302014-08-19T00:55:20+5:30

मुंडे यांच्या निधनानंतर प्रदेश भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पक्षाने आता त्यांच्या कन्येच्या माध्यमातून ‘मुंडे’कार्ड खेळले आहे.

BJP played 'Munde' card | भाजपाने खेळले ‘मुंडे’कार्ड

भाजपाने खेळले ‘मुंडे’कार्ड

मुंबई : ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी संघर्ष यात्रेद्वारे महाराष्ट्र ढवळून काढला होता. आता दिवंगत मुंडे यांच्या कन्या आ. पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्र भाजपाने आयोजित केली आहे. मुंडे यांच्या निधनानंतर प्रदेश भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पक्षाने आता त्यांच्या कन्येच्या माध्यमातून ‘मुंडे’कार्ड खेळले आहे. 
वंजारी समाजासह ओबीसींच्या व्होटबँकेवर नजर असलेल्या भाजपाला मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात लक्षणीय संख्या असलेला हा समाज भाजपापासून दुरावतो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय निर्माण झाल्याने अशी स्थिती निर्माण होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर भाजपाने मुंडे यांच्या कन्येला पुढे केल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत राज्यातील 21 जिल्ह्यांत आणि 79 विधानसभा मतदारसंघांतून जाणा:या या संघर्ष यात्रेची घोषणा पंकजा यांच्या उपस्थितीत केली. (विशेष प्रतिनिधी) 

 

Web Title: BJP played 'Munde' card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.