वाढत्या गुंडगिरीला भाजपाचा राजाश्रय - अशोक चव्हाण
By Admin | Updated: August 24, 2016 05:28 IST2016-08-24T05:28:21+5:302016-08-24T05:28:21+5:30
मतांसाठी थेट गुन्हेगारांची मदत घेण्याइतपत भाजपची मजल गेली आहे.

वाढत्या गुंडगिरीला भाजपाचा राजाश्रय - अशोक चव्हाण
अमरावती : मतांसाठी थेट गुन्हेगारांची मदत घेण्याइतपत भाजपची मजल गेली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गुंडगिरीला भाजपचा राजाश्रय असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केला. महापालिका निवडणुक ीच्या पार्श्वभूमिवर चव्हाण यांनी काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महागाई, शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी अशा कुठल्याही बाबतीत सरकार गंभीर नसल्याने सरकारचा यंत्रणेवर धाक उरला नसल्याची टीका केली. गेंड्याची कातडी पांघरलेले हे सरकार आरोपी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)