भाजपा पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

By Admin | Updated: July 11, 2016 05:36 IST2016-07-11T05:36:18+5:302016-07-11T05:36:18+5:30

सेक्स रॅकेट प्रकरणातील महिला आरोपी शोभा गमलाडू हिचे शिवसेनेच्या नेत्यांसमवेत असणारे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी केडीएमटीचे

BJP office bearers assaulted by Shiv Sena | भाजपा पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

भाजपा पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

कल्याण : सेक्स रॅकेट प्रकरणातील महिला आरोपी शोभा गमलाडू हिचे शिवसेनेच्या नेत्यांसमवेत असणारे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी केडीएमटीचे परिवहन व जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य सुभाष म्हस्के यांच्या तोंडाला शाई फासून मारहाण केली. ही घटना रविवारी पूर्वेकडील लोकग्राम भागात घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सेक्स रॅकेट प्रकरणात उल्हासनगर शहरातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी गमलाडू यांना ठाणे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेजसमोरील एका हॉटेलमधून दोन मुलींच्या सुटकेसाठी केलेल्या कारवाईत ही अटक झाली. दरम्यान, ती शिवसेनेची पदाधिकारी नसून, सहा महिन्यांपूर्वीच शोभा यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शोभा यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर असलेले फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. हे फोटो म्हस्के यांनी व्हायरल केल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी त्यांना भररस्त्यात मारहाण केली. या वेळी म्हस्के यांच्या तोंडाला काळी शाईही फासली. आमच्या नेत्यांची बदनामी कराल, तर भाजपाच्या नेत्यांच्याही तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)

फोटो व्हायरल केलेले नाहीत - म्हस्के
चक्कीनाका परिसरातून म्हस्के हे घरी परतत असताना ही घटना घडली. आपण अशा प्रकारचे कोणतेही फोटो व्हायरल केलेले नाहीत, असे म्हस्के यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: BJP office bearers assaulted by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.