भाजपाच्या वाटेवर नाही
By Admin | Updated: April 28, 2017 03:39 IST2017-04-28T03:39:00+5:302017-04-28T03:39:00+5:30
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार गुरुदास कामत हे भाजपात जाणार, अशा आशयाच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत.

भाजपाच्या वाटेवर नाही
मुंबई : काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार गुरुदास कामत हे भाजपात जाणार, अशा आशयाच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. मात्र कामत यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पक्षाच्या सर्व पदांच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केली होती. भाजपात जाणार असल्याच्या बातम्या खोडसाळपणाच्या असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटल्यानंतर शुक्रवार, २१ एप्रिल रोजी जाहीररीत्या फेसबुक आणि टिष्ट्वटरच्या माध्यमातून पदांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार सर्व पदांच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्धार कायम होता, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय अशोक गेहलोत यांना सरचिटणीसपद देण्यावरून व गुजरातचे प्रभारी आणि चार सचिवांच्या नियुक्तीशीदेखील आपल्या निर्णयाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून अजूनही पक्षाचा सरचिटणीस, राजस्थानचा प्रभारी म्हणून राहावे, असे त्यांनी सांगितल्याबद्दल अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना धन्यवाद देत असल्याचे कामत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)