भाजपा-राष्ट्रवादीची निवडणुकीत ‘सेटलमेंट’
By Admin | Updated: November 15, 2014 02:14 IST2014-11-15T02:14:43+5:302014-11-15T02:14:43+5:30
फडणवीस यांना आता मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला?, असा सवाल माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

भाजपा-राष्ट्रवादीची निवडणुकीत ‘सेटलमेंट’
सांगली : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी भ्रष्टाचारी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, असे ठामपणो म्हणणा:या देवेंद्र फडणवीस यांना आता मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला?, असा सवाल माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीपूर्वीच या दोन्ही पक्षांचे साटेलोटे झाले होते, अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका करून सत्तेवर आल्यानंतर त्यांचे घोटाळे उघडकीस आणण्याची घोषणा भाजपा नेत्यांनी केली. पण भाजपाचे हे नेते निकालानंतर लगेच बदलले आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा पाठिंबा घ्यावाच लागेल
जनतेच्या हितासाठी स्थिर सरकार चालवायचे असेल, तर भाजपाला राष्ट्रवादीचा नव्हे, तर शिवसेनेचाच पाठिंबा घ्यावा लागणार आहे. सध्या त्यांची राजकीय खेळी चालू असली तरी, भविष्यात भाजपा शिवसेनेबरोबरच जाईल, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.