शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:48 IST

BJP Narayan Rane News: मुंबई महानगरपालिका जिंकणे आता उद्धव ठाकरेंना शक्य नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

BJP Narayan Rane News: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष करून मुंबईत पालिका निवडणुकीपूर्वी या सोहळ्यांना महत्त्व आहे. यातच भाजपा नेते नारायण राणे यांनी एक कबुली दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की,  मी मान्य करतो बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो. मला हे दिवस दिसले. त्यामुळे बाळासाहेब हेच माझे गुरू आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना कायदेशीर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे त्यांची (उद्धव ठाकरे) शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद. बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधी पदासाठी आणि पैशांसाठी तडजोड केली नाही. यांनी पदासाठी तडजोड केली. यांनी बाळासाहेबांची विचारधारा यांनी सांभाळली नाही, आजही सांभाळत नाहीत, अशी टीका नारायण राणे यांनी केली. 

यांचा कसला वर्धापन दिन? एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे यांचा कसला वर्धापन दिन? उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काही केले नाही आणि आता तर त्यांचे दुकान बंद झाले आहे. ते धडपडत आहेत. बाळासाहेबांची खरी विचारधारा त्यांनी टिकवलेली नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्राचे कोणतेही भवितव्य घडणार नाही. कोणत आहेत ते? आमदार किती, खासदार किती? देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणात त्यांचा काही रोल नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी निशाणा साधला. 

दरम्यान, त्यांचे लक्ष आता फक्त मुंबई महापालिकेवर आहे. २६ वर्षे दुकान मांडले. जेवढा भ्रष्टाचार करायचा तेवढा केला. आता परत शक्य नाही. महानगरपालिका जिंकणे पूर्वीच्या शिवसेनेला (आताचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शक्य नाही. आता आम्ही आहोत इकडे. आम्ही कसे देऊ? असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे