भाजपा आमदाराचे प्राचार्यपद बनावट

By Admin | Updated: June 3, 2015 01:46 IST2015-06-03T01:46:30+5:302015-06-03T01:46:30+5:30

भाजपाचे वर्धा विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विद्यापीठात बनावट कागदपत्रे सादर करुन महिला विकास संस्था संचालित पुलगाव येथील कला

BJP MP's post of principal | भाजपा आमदाराचे प्राचार्यपद बनावट

भाजपा आमदाराचे प्राचार्यपद बनावट

वर्धा : भाजपाचे वर्धा विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विद्यापीठात बनावट कागदपत्रे सादर करुन महिला विकास संस्था संचालित पुलगाव येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्यपद मिळवले. असा आरोप युवक काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव महेश तेलरांधे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
माहितीच्या अधिकारात रातुम नागपूर विद्यापीठाकडून प्राप्त दस्तावेज त्यांनी यावेळी सादर केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी विद्यापीठाच्या कुलगुरु व कुलसचिवाकडे केली आहे. शिष्यवृत्ती घोटाळ्यातील कथित सहाभागापाठोपाठ सदर प्रकरणानेही आ. भोयर यांच्या अडचणीत भरच घातली आहे. डॉ. पंकज भोयर यांच्या अधिव्याख्याता पदाकरिता विद्यापीठाद्वारे गठित निवड समितीची बैठक ५ नोव्हेंबर २००० रोजी झाल्याचे कागदपत्रांवरुन समजते. डॉ. भोयर यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) ची परीक्षाच ६ आॅक्टोबर २००० रोजी उत्तीर्ण केलेली आहे. शैक्षणिक अहर्ता प्राप्त होण्याच्या तीन महिन्याआधीच म्हणजे १ जुलै २००० रोजी त्यांची अधिव्याख्याता म्हणून रुजू झाल्याची बाब तेलरांधे यांनी तक्रारीत नमूद केली आहे.
अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाच्या निवडीसाठी शासन प्रतिनिधी म्हणून सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर यांची उपस्थिती असणे आवश्यक होती. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची निवड झाल्याचे दिसून येते, याकडेही तेलरांधे यांनी लक्ष वेधले आहे. डॉ. पंकज भोयर यांनी विद्यापीठ व शासनाची दिशाभूल करुन वेतन स्वरुपात शासनाचे पैसे लाटले असून याबाबत योग्य कार्यवाहीची मागणीही विद्यापीठाकडे करण्यात आल्याची माहितीही तेलरांधे यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP MP's post of principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.