शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे खासदार नाना पटोले यांचा पक्षाला घरचा आहेर; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:11 IST

भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देभाजपाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची कीव येते. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या सरकारला खासदारांची किंमत नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

नागपूर, दि. 1- भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची कीव येते. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या सरकारला खासदारांची किंमत नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. केंद्राच्या निधीबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे विषय उपस्थित केला तर त्यांनी खासदारांची बैठक बोलावणे बंद केलं, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.  मुख्यमंत्री विदर्भाचा असो की कुठल्याही भागाचा मुख्यमंत्री पद मिळालं की तो व्यक्ती बदलतो, अशी थेट टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

नागपूरमध्ये आयोजीत विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रृ या कार्यक्रमात खासदार नाना पटोले बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत शेतीचं वास्तव सांगितलं तर मोदी माझ्यावर भडकले, कारण त्यांना असं काही ऐकण्याची सवय नाही, असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे. मी सध्या हिटलिस्ट वर आहे, पण मी आता कुणाला घाबरत नाही, असंही ते म्हणाले. केंद्रातील मंत्री दहशतीच्या वातावरणात असतात म्हणून मला मंत्रीपद नको, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. सर्व विकास नागपुरचाच होतो आहे आणि नागपूरचं घाण पाणी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पाठवताय. तुमची मेट्रो नागपुरातच काय फिरवता, भंडाऱ्यापर्यंत येऊ द्या जरा आमचाही विकास होऊ द्या, असंही नाना पटोले या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

दिल्लीतून बघितल्यावर महाराष्ट्र मला भिकारी दिसतो, पण ही स्थिती बदलण्यासाठी मी नेहमी भांडत राहणार, असं वक्तव्यही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपा