शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार हे गद्दारीचे आदिपुरुष, आज त्यांचा...; भाजपा खासदार अनिल बोंडेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 17:51 IST

कोण गद्दार आहे त्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करा असं बोंडेंनी म्हटलं. 

अमरावती - राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाला आज १ वर्ष झाला असून हा दिवस गद्दार दिन, खोके दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आजच्या दिवशी ठिकठिकाणी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी थेट शरद पवारांवर खोचक टीका केली. 

खासदार अनिल बोंडे म्हणाले की, शिवसेनेतून हिंदुत्वाचा विचार घेऊन चाळीस आमदारांनी उठाव केला ते गद्दार नाहीतर स्वाभिमानी आहेत. मात्र, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गद्दार दिन साजरा करत आहे, त्यांनी आज गद्दारदिनाऐवजी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करावा. कारण महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण करून पहिल्यांदा कुणी सरकार स्थापन केलं असेल तर ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आहेत. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचे शरद पवार हे आदीपुरुष आहेत. त्यामुळे कोण गद्दार आहे त्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करा असं त्यांनी म्हटलं. 

शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर खोक्यांची प्रतिकृती उभारून पन्नास खोके एकदम ओके म्हणत आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. मुंबईतही राष्ट्रवादी भवनाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन करत खोके खोके घोषणाबाजी केली. 

...तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत - सुप्रिया सुळेया राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. 'महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'...'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद माझ्यात आहे असं सुप्रिया सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Bondeअनिल बोंडे