शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हर्बल तंबाखूचा वापर रोज केला तर मानसिक संतुलन बिघडतं, मोहित कंबोज यांचा मलिक यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 20:33 IST

महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे आहेत, असं मलिक म्हणाले होते.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला (Wine sale in Super Market and General Stores) परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला. इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला. दरम्यान, बोलताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातभाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे असल्याचं विधानही त्यांनी केलं. यावरून आता मोहित कंबोज यांनी टोला लगावला आहे.

"हर्बल तंबाखूचा वापर जर माणसानं दररोज केला तर तो आपलं मानसिक संतुलन गमावतो. नवाब मलिक यांनी आज ज्याप्रकारचं वक्तव्य केलं, त्यावर हर्बल तंबाखूनं त्यांच्या डोक्यातील नसा डॅमेज केल्याचं दिसतंय. ज्यांच्या कुटुंबातील लोकांचं थेट कनेक्शन ड्रग्स, गांज्याच्या विक्रीशी आहे, ते दुसऱ्यांवर का बोट दाखवत आहेत?," असा सवालही कंबोज यांनी केला.

"आज वाईनच्या जे धोरण आहे, त्यातील भ्रष्टाचार, महाराष्ट्रातील लोकांना दारुडं बनवण्यावरून जेव्हा टीका होताना दिसली, तेव्हा आरोप भाजपच्या लोकांवर केला. तुम्ही पहिले आत्मचिंतन करायला हवं. कोण ड्रग्स पॅडलर्सचा प्रवक्ता आहे, कोणाशी कनेक्शन आहे, याचं उत्तर द्या. मी तुमच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि तुम्ही यावर माफी मागायला हवी," असंही ते म्हणाले.काय म्हणाले होते मलिक?"महाराष्ट्रात सर्वात जास्त दारूच्या दुकानांचे परवाने आणि इतर दारूसंबंधीच्या गोष्टींमध्ये भाजपाच आघाडीवर आहे. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचं 'मद्यराष्ट्र' होऊ देणार नाही. मग मध्य प्रदेश पॉलिसी पाहता त्याचं नाव 'मद्य प्रदेश' ठेवायचं का? त्या राज्यात नवीन प्रकारची दारू बनवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यावर उत्पादन शुल्कही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आधी त्याबद्दल बोलावं", असा सणसणीत टोला मलिकांनी भाजपाला लगावला.

टॅग्स :BJPभाजपाnawab malikनवाब मलिकMaharashtraमहाराष्ट्र