शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारांनी डबल सह्या केल्या, अजित पवारांनी भर विधानसभेत पितळ उघडं पाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:08 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसंच विरोधकांनी सादर केलेल्या निवेदनांवरुन एक पोलखोलच भर सभागृहात केली.

मुंबई-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसंच विरोधकांनी सादर केलेल्या एका निवेदनाची  पोलखोलच भर सभागृहात केली. धानाच्या मागणी संदर्भातील एक मागणी करणारं निवेदन भाजपाकडून अजित पवार यांना देण्यात आलं होतं. या निवेदनात भाजपा नेत्यांनी चक्क दोन-दोन वेळा सह्या करुन यादी वाढविण्याचा प्रयत्न केल्याचं पितळ अजित पवारांनी उघडं पाडलं. इतकंच नव्हे तर या यादीत ज्या आमदारांची नावं होती त्यातील बहुतांश आमदार आमच्याकडूनच तुमच्यात गेलेत, असा टोलाही लगावला. 

अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर यावेळी भाजपा नेत्यांकडून आक्षेप घेण्याचाही प्रयत्न झाला. तेव्हा अजित पवार चांगलेच संतापले आणि आपण सारंकाही नीट बघूनच सांगत आहे. जे समोर आहे तेच सांगतोय, चूक मान्य करा. डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न झाला आहे, असं अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं. 

नेमकं काय घडलं?"विरोधी पक्षाकडून माझ्याकडे मुख्यमंत्र्याकरिता एक पत्रं देण्यात आलं. यात फडणवीस यांचीच सही नाही. बाकीच्यांच्या सह्या आहेत. मुनगंटीवारांनी त्यांची सही पहिली घातली. आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची दुसरी सही आहे. पण फडणवीसांचीच सही यात नाही. बबनराव पाचपुते वगैरे तर आमचेच आहेत. या सह्यांमधले १०-२० टक्के आमच्याकडून तुमच्याकडे गेलेलेच आहेत. ते काही बाहेरचे लोक नाहीत", अशी अजित पवार यांनी विरोधकांची फिरकी घेतली. 

अजित पवार यांनी यावेळी विरोधकांनी दिलेल्या मागणी पत्रात आमदारांनी दोन-दोन वेळा सह्या केल्याचंही दाखवलं. "निवेदनातील सह्या मी मुद्दाम दाखवतो. एका पानावर राधाकृष्ण विखे पाटील यांची सही आहे. श्वेताताई महालेंची सही आहे. पुढे पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा सही आहे. दादाराव केचेंचीही पुन्हा सही आणि श्वेता महालेंची सुद्धा दुसऱ्यांदा सही आहे", असं अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं. यावेळी भाजपा नेत्यांनी अजितदादा तुम्ही नीच पाहा दोन निवदेनं असतील असं म्हटलं. त्यावर अजित पवारांनी "नाही बाबा दोन कॉपी नाहीत. गिरीषजी मी बारकाईनं बघितलं. जे चुकलं ते चुकलं. डबल डबल सह्या करुन आकडा वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकरी धानाबाबत विरोधकांनी काही मागणी केली आहे. हरकत नाही. आम्ही सूचना केल्या आहेत. पण थोडं संयमानं घ्या. तुम्ही थोडंही पेशन्स ठेवत नाही. तुम्हाला कसं काहींनी सांभाळून घेतलं काय माहित", असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस