शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 22:27 IST

भाजपा आमदार सुरेश धस बरळले 

औरंगाबाद: भारतीय हवाई दलातील विरप्पनसारखा अभिनंदन वर्धमान पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अवघ्या 60 तासात मायदेशी परतला, अशी मुक्ताफळं भाजपा आमदार सुरेश धस यांनी उधळली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचं आणि खंबीर नेतृत्त्वाचं लक्षण असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केलं. यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचं सांगत धस यांनी सारवासारव केली. 14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला. 26 फेब्रुवारीला भारतानं एअर स्ट्राइक केल्यावर 27 तारखेला पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलानं उधळून लावला. त्यावेळी आकाशात दोन्ही हवाई दलांच्या विमानांची चकमक झाली. त्यावेळी मिग-21 मधील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान पाडलं. मात्र त्यानंतर अभिनंदन यांचं विमान कोसळलं. त्याआधी त्यांनी स्वत:ची विमानातून सुटका केली. मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांच्य हाती लागले. जवळपास 60 तास ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. 1 मार्चला ते वाघा बॉर्डरवरुन मायदेशी परतले. धस यांच्याआधी प्रदेशाध्यक्ष दानवे बरळलेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 5 एप्रिलला पुलवामा हल्ल्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगरमध्ये रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुलवामात आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचं म्हटलं. रावसाहेब दानवेंनी जवानांना दहशतवादी संबोधलं. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला गेला. विशेष म्हणजे दानवेंनी दुसऱ्यांदा ही चूक केली. मार्चमध्येही दानवेंनी जवानांबद्दल बोलताना अतिरेकी शब्द वापरला होता. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानSuresh Dhasसुरेश धसindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे