शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार पाटणी यांनी केला ५०० कोटींचा जमीन घोटाळा, भावना गवळी यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 19:25 IST

या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय आणी ईडीलासुद्धा पत्र देणार असल्याचे खासदार गवळी यांनी म्हटले आहे.

वाशिम - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या लेटरबॉम्बनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २० ऑगस्ट रोजी खासदार भावना गवळी (Bhavana gawli) यांनी आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी खोटे दस्तावेज तयार करून ५०० कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप पत्रपरिषदेत केला. (BJP MLA Rajendra Patni commits Rs 500 crore land scam, serious allegation by Bhavana gawli)

खासदार गवळी म्हणाल्या की, वाशिम शहरातील रिसोड मार्गावर असलेले व्यावसायीक दुकानांचे गाळे अवैधरित्या बांधलेले आहे. यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे. या गाळ्यांमध्ये २०१४ ते २०१७ पर्यंत अधिकृत विजेचे कनेक्शन नसताना विज कशी वापरल्या गेली, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या जागेवर फ्लॅटचे (निवासी) बांधकाम करण्याची परवानगी मागितली, त्या जागेवर व्यावसायीक दुकानांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचा आरोप त्यांनी केला.

भावना गवळी यांनी 22 वर्षांत केला १०० कोटींचा घोटाळा, आपल्याकडे सबळ पुरावे; किरीट सोमय्यांचा दावा

याशिवाय वाशिम शहरातील शेत स.नं. ५०२ ही पुसद नाका लगतची जमीन अकृषक करण्यासाठी एकत्रीत खरेदी दाखविल्या गेली. तथापि, ही खरेदी वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहे. सन २००९-१० मध्ये जमीनीचे चुकीचे फेरफार तयार करण्यासाठी महसूल विभागाला भाग पाडले. वाशिम येथील एका तलाठ्याला हाताशी धरून चुकीचे दोन फेरफार तयार करावयास लावले. त्यामध्ये फेरफार क्र. ४४१९ व फेरफार ४४२० या दोन्ही फेरफारचे आधार किंवा फेरफारचा व्यवहार हा वाटणीपत्र असे चुकिचे दाखविण्यात आल्याचा आरोप खासदार गवळी यांनी केला. अशाप्रकारे शहर व ईतर ठिकाणच्या जमिनी बळकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून सुमारे ५०० कोटी रूपयांचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप खासदार गवळी यांनी केला आहे.या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय आणी ईडीलासुद्धा पत्र देणार असल्याचे खासदार गवळी यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक, कारवर फेकली शाई 

"मुख्यमंत्री ठाकरे व पोलीस गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत"खासदार भावना गवळी व समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत. हेच त्यामागील मुख्य कारण असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणी