शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार नितेश राणेंचं प्रतिआव्हान; सुप्रिया सुळेंनी तारीख अन् वेळ ठरवावी, मी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 20:00 IST

जेव्हा धर्मांतर करत नाही तेव्हा तिला मारून टाकण्यापर्यंतची असंख्य उदाहरणे आमच्या महाराष्ट्रात आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं. 

मुंबई - लव्हजिहाद कायदा व्हावा यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी हिंदु आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुंबईतही अलिकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क याठिकाणी मोर्चा काढला होता. मात्र लव्ह जिहादची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय जर कुणाला माहिती असेल तर मी चर्चा करायला तयार आहे असं विधान करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी खुलं आव्हान स्वीकारलं आहे. 

आमदार नितेश राणे म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी जे काही सांगितले मी लव्ह जिहादवर चर्चा करायला तयार आहे. मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे. लव्ह जिहाद कशाला म्हणतात. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवलं जाते. त्यांचे आयुष्य खराब केले जाते. याची असंख्य उदाहरणे, संबंधित मुलींना भेटवण्यापासून मी द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच कुणी कुणासोबत लग्न करणे यावर आक्षेप नाही. परंतु लग्नाच्या नावाने प्रेमाच्या नावाने आधी तो अमर होतो त्यानंतर अमीन होतो याला प्रेम प्रकरण म्हणत नाही. लग्नानंतर तुम्ही हिंदू भगिनींना नाव बदलायला सांगता. इस्लाम कुराण वाचायला सांगतात. तिला हिंदू सण साजरे करण्यास बंदी केली जाते. बळजबरीनं धर्मांतर केले जाते. जेव्हा धर्मांतर करत नाही तेव्हा तिला मारून टाकण्यापर्यंतची असंख्य उदाहरणे आमच्या महाराष्ट्रात आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं. 

दरम्यान, सुप्रियाताईंना त्यांच्या ज्ञानात भर टाकायची असेल तर त्यांनी तारीख, वेळ ठरवावी. लव्ह जिहाद नेमकं कसं होतं? यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य कसं बर्बाद होते. त्याचे सगळे पुराव्यासकट सांगायला तयार आहे असं आव्हान देत हे ऐकल्यानंतर सुप्रिया सुळेही आमच्यासोबत लव्ह जिहादचं हे आव्हान पेलण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? लव्ह जिहाद हा गंभीर विषय असून मी गेल्या काही दिवसांपासून त्यावर मनमोकळे बोलतेय. राज्यात मोर्चे काढण्याची एक नवी पद्धत निघाली आहे. हे मोर्चे तुम्हाला फक्त सांगतात की काय खायचं, लग्न कुणाशी करायचं. एखाद्या धर्माबद्दलची माहिती त्यातून पोहचली जाते. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाचीही चर्चा करायला तयार आहे असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिले होते.  

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेLove Jihadलव्ह जिहाद