अपघातात भाजपा आमदार नारायण कुचे जखमी
By Admin | Updated: April 24, 2017 13:09 IST2017-04-24T13:09:33+5:302017-04-24T13:09:33+5:30
भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या स्कॉर्पिओ गाडीने एका शाळेच्या वाहनाला धडक दिली.

अपघातात भाजपा आमदार नारायण कुचे जखमी
ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 24 - भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या स्कॉर्पिओ गाडीने एका शाळेच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात काही विद्यार्थ्यांसह आमदार कुचे स्वत: जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी मोतीबाग परिसरात हा अपघात झाला. आमदार कुचे यांच्या डोक्याला आणि मानेला मार लागला.
अपघातानंतर लगेचच जखमी विद्यार्थी आणि आमदार कुचे यांना तात्काळ नजीकच्या रूग्णालयात दाखल केले. स्कार्पिओचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. नारायच कुचे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.