शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

...अन् भाजपा आमदाराने धरले फिर्यादीचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:58 IST

हडपसरचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी, खंडणीचा गुन्हा दाखल करू नये यासाठी आपले पाय धरले होते, असा दावा या प्रकरणातील फिर्यादी रवींद्र बऱ्हाटे यांनी केला आहे.

पुणे : हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करू नये यासाठी आपले पाय धरले होते, असा दावा या प्रकरणातील फिर्यादी रवींद्र बऱ्हाटे यांनी केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिळेकर पाया पडत असल्याचा व्हिडीओही त्यांनी पुरावा दिला आहे. तर आपण खोट्या गुन्ह्यात अडकवू नका म्हणून गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर बऱ्हाटे यांना भेटलो होतो, असा दावा आमदार टिळेकर यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हेगार असलेले आमदार, भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरुद्ध ५० लाखा रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी चौकशी करण्यापेक्षा पोलीस आपलीच म्हणजे फिर्यादीची चौकशी करत असल्याचा आरोपही बऱ्हाटे यांनी केला आहे.मंगळवार सकाळपासून आमदार टिळेकर यांनी बऱ्हाटे यांची भेट घेऊन त्यांचा माफी मागितली असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला़ टिळेकर म्हणाले, खंडणीचा गुन्हा दाखल होण्याआधी मी बºहाटेंकडे गेलो होतो. या भेटीदरम्यान मी त्यांना सांगितले की, मी आमदारपदापर्यंत पोहचण्यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खर्च झाली आहेत. तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला तर माझ्या राजकीय जीवनाला त्रास होईल. तुमचा गैरसमज झाला असेल तर तो काढून टाका़ ज्या आॅडिओ क्लिपबाबत बऱ्हाटे बोलत आहेत ती आॅडिओ क्लिप देखील पत्रकारांना ऐकवावी.बऱ्हाटे पत्रकार परिषदेत म्हणाले, आॅगस्ट महिन्यात ई व्हिजन टेली इंफ्रा प्रा. लिमिटेड यांचे कोंढवा भागात काम सुरु होते. गणेश कामठे यांनी या भागात काम करायचे असेल तर आमदारांना ५० लाखाची खंडणी द्यावी लागेल. टिळेकर यांचे भाऊ चेतन यांनी केबल कंपनीच्या मालकांना फोन लावून खंडणीच्या रक्कमेत तडजोड करायला लावली. या सर्व फोनवरील संभाषणाचे ध्वनिमुद्रण करून केबल कंपनीद्वारा कोंढवा पोलीस ठाण्यात ८ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार देण्यात आली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी टिळेकरांना चौकशी करिता पोलीस ठाण्यातून फोन आला. पण त्यानंतर टिळेकर यांनी थेट बिबवेवाडी येथे बराटे यांची भेट घेतली आणि हात जोडून तक्रार मागे घेण्याकरिता विनंती केली तरी देखील तक्रार मागे घेतली गेली नाही. म्हणून अधिकाराचा गैरवापर करीत पोलीस अधिकºयाची बदली देखील करण्यात आली. एवढेच नाही तर आरोपींची चौकशी करण्याऐवजी तक्रारदाराचीच चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार