शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'नवाब मलिक मनोवृत्तीनंही भंगारवाले; अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 16:39 IST

नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

मुंबई : क्रूझ ड्रग्स पार्टी अथवा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमाने नवनवे आरोप किंवा खुलासे करत आहेत. मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. (Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray and Nawab Malik)

काय म्हणाले भातखळकर? -यासंदर्भात, आमदार भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भंगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत.'

‘गुड गोईंग’ म्हणत मुख्यमंत्र्यांची मलिकांना कौतुकाची थाप -मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचे नाव न घेता लगावला होता. एवढेच नाही, तर ‘गुड गोईंग’ अशा शब्दात त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची माहिती समोर आली होती. 

...अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा - अमृता फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांच्या जावयाच्या घरात अंमली पदार्थ सापडले असे म्हटले होते. याविरोधात मलिकांची कंन्या निलोफर यांनी फडणवीस यांना जाहीर नोटीस पाठवली होती. यानंतर, आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागावी आणि 48 तासांच्या आत हे ट्विट डिलिट करावे, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरnawab malikनवाब मलिकBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे