शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

NRC आणि CAA कायद्याविरोधात भाजपात नाराजीचा सूर; मुस्लिम कार्यकर्ते करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:20 IST

केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारे आणि संविधानाचे उल्लंघन करणारे आहे.

ठळक मुद्देसरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणाराया कायद्यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला तडा जाईलअन्यथा भाजपा अल्पसंख्याकचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात हिंसक आंदोलनाने पेट घेतला असताना सत्तेत असणाऱ्या भाजपामध्येच नाराजीचा सूर उमटत असल्याचं पुढे येत आहे. सांगली येथे भाजपा अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारने आणलेल्या एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जाहीर विरोध करण्याचा ठराव मांडण्यात आला. 

सांगली भाजपा अल्पसंख्याक युवा जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेऊन समाधानकारक उत्तर मिळावे अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना भाजपाचे कार्यकर्ते अशरफ वांकर म्हणाले की, सध्या देशात भारतीय मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानिमित्ताने काहीजण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे. एनआरसी आणि सीएए कायदाविरोधात आमची भूमिका आहे. या कायद्याविरोधात भाजपा अल्पसंख्याक कार्यकर्त्यामध्ये केंद्र सरकारवर नाराजीचा सूर उमटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या कायद्यात स्पष्टता आणावी. भारतीय मुस्लिमांवर या कायद्याचा परिणाम होणार नाही हे कसं ते स्पष्ट करावं. या दोन्ही विधेयकावरुन जे राजकारण देशात तापलं आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देणार आहोत. यानंतर आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

तर केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारा आणि संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला तडा जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने या कायदा रद्द करावा. तसेच याबाबत सरकारने समाधानकारक बदल न केल्यास भाजपा अल्पसंख्याक विभागाचे मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असा इशारा भाजपा अल्पसंख्याक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम पन्हाळकर यांनी दिला आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं नागरिकत्व सुधारणा कायद्यावर प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. पण हा कायदा संविधानानुसार लागू करता होऊ शकतो की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय 22 जानेवारीला सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), काँग्रेस नेते जयराम रमेश आणि अन्य याचिकांवर 22 जानेवारी 2020 रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीसही पाठवली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAmit Shahअमित शहा