शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिवसेनेकडून आता भाजपा मंत्रीही लक्ष्य

By admin | Updated: February 9, 2017 01:30 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलेले असताना आता

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलेले असताना आता शिवसेनेने भाजपाच्या आजीमाजी मंत्र्यांकडे मोर्चा वळवून त्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुस्तिका काढली आहे.शिवसेनेच्या कार्यालयातून देण्यात येत असलेल्या ‘घोटाळेबाज भाजपा’ या पुस्तिेकत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट,अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे फोटो मुखपृष्ठावर छापून त्यांची नावे कोणत्या गैरव्यवहारात आहेत याचा उल्लेख केला आहे. आतील पानावर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्य मंत्री डॉ.रणजित पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार प्रवीण दरेकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे फोटो आतील पानांत गैरव्यवहारांच्या उल्लेखांसह दिलेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे नाव चिक्की घोटाळ्यात आले होते. त्याचा केवळ एका ओळीत उल्लेख केला आहे. ‘आमच्या लोकांना पैसे कसे खायचे हेच कळत नाही’ हे पंकजा यांचे वादग्रस्त विधान तेवढे नमूद केले आहे. प्रमोद महाजन हे माहिती प्रसारण मंत्री असतानाच्या काळात रिलायन्सच्या सोबतीने घोटाळा झाला होता याची आठवण मात्र करून देण्यात आली आहे. या शिवाय, केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नावाचा पुण्यातील एका जमीन घोटाळ्याप्रकरणी उल्लेख आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान आज पत्रकारांना प्रचारसाहित्याची किट देण्यात आली, त्यात ‘घोटाळेबाज भाजपा’ ही पुस्तिकाही होती. तथापि, त्यावर प्रकाशकाचे नाव नाही. याबाबत पक्षाच्या जनसंपर्क प्रमुखांकडे विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट केले की, ही पुस्तिका शिवसेनेने छापलेली नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव ती देण्यात आली आहे.मोदी सरकारचे घोटाळेकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे घोटाळेमुक्त असल्याचा दावा भाजपा करीत आली आहे. त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र, केंद्रातील घोटाळ्यांची जंत्री या पुस्तिकेत सादर केली आहे. त्यात छत्तीसगडमधील ३६ हजार कोटींचा तांदूळ घोटाळा, मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा, राजस्थानमधील खाण गैरव्यवहार, ललित गेट घोटाळा, स्पेक्ट्रम लिलावात झालेले देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान या विषयांवरून केंद्र सरकार आणि भाजपाप्रणित राज्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. नाशिक, पुण्यातील गुंडांना भाजपात दिलेला प्रवेश, आ. आशिष शेलार यांच्यावर नवाब मलिक आणि प्रीती शर्मा मेनन यांनी केलेले कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप, अभिनेत्री खा.हेमामालिनी यांना नाममात्र दरात शासनाचा मोठा भूखंड देणे, नागपुरात वाढलेली गुन्हेगारी यांचा उल्लेख करताना खा.किरीट सोमय्या यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कारकिर्द कशी वादग्रस्त राहिली आहे, यावर सहा पाने खर्ची घालण्यात आली आहेत.