शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 18:07 IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत, राणेंचा निशाणा.

सध्या कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून विरोध सुरू आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. बारसू रिफानरीवरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आता यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची माहिती घ्या, असा सल्ला दिलाय.

“कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची उद्धव ठाकरेंनी माहिती घ्यावी. कॅलिफोर्नियामध्ये रिफायनरीचे १४ प्रकल्प आहेत. तिकडे निसर्ग नाही? मग इकडेच विरोध का? मी काँग्रेसकडून मंत्री असताना असतानाही १० हजार मेगावॅटचा प्रकल्प बंद करण्याची मागणी करण्यात आली. वृत्तपत्रात बातमी आली मातोश्रीत कोळशापासून वीज उत्पादन करणारे ३४ वीज उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले, जैतापुरचा प्रकल्प सुरू करू नका, तो झाला तर आमचे कारखाने बंद पडतील, आम्हाला योग्य दर मिळणार नाही, तोट्यात जाऊ असं होतं. नंतर नेहमीप्रमाणे ५०० कोटी द्यायचं ठरलं आणि ॲडव्हान्स ५ कोटी,” असं नारायण राणे म्हणाले. 

“राऊत काय म्हणतात नारायण राणे त्यांना घेऊन आले होते. अर्धे नारायण राणेंना अर्धे उद्धव ठाकरेंना. त्यांना माहित नाही का मातोश्रीत गेलेल्या पैशाची वाटणी कधी होते का? तिकडे इनकमिंग आहे, आऊटगोईंग नाही. मी तेव्हा काँग्रेसमध्ये मंत्री होतो, मी त्यांना २५० कोटी का देईन. उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत,” असं वक्तव्य त्यांनी केलं.कोकणाच्या विकासात योगदान नाही“महाराष्ट्रात इतके नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एनरॉन, जैतापूरला विरोध, हायवेला, सिंधुदुर्गात विमानतळ आलं जागा घेण्याच्या प्रक्रियेलाही विरोध, आजवर कोकणातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केलाय. कोकणाबद्दल आस्था, प्रेम आहे की द्वेष आहे. यांनी गेल्या अडीच वर्षात कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही. यांचं कोकणाच्या विकासात योगदान काही नाही,” असा आरोपही त्यांनी केला.काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?इतके प्रकल्प बाहेर नेले. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत