शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 23:38 IST

BJP Chandrakant Patil News: हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. इंग्रजी चालते, पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

BJP Chandrakant Patil News: मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात आता मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. या दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या तारखा बदलण्यात आल्या असून, आता हा मोर्चा ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट हेही मोर्चात सहभागी होणार आहेत. हिंदीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतैक्य दिसत आहे. त्याचवेळी सत्तारुढ महायुतीत मतैक्याचा अभाव असल्याचे चित्र आहे. मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. 

देशामध्ये ५५ टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक आहेत, ज्या मुंबईत राहतो, त्यात दीड कोटी लोक अमराठी आहेत. त्यांच्याशी बोलताना हिंदी हवी की नको? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. इंग्रजी चालते, पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा

सरकार वारंवार असे म्हणते आहे की, आम्ही हिंदीची सक्ती करत नाही. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान मोदी आग्रह धरला की, शिक्षण हे मातृभाषेतून मिळायला पाहिजे. आपल्याला आपली मुले महाराष्ट्रातच राहावी असे वाटत असेल, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पहिलीपासून इंग्रजीही सक्तीची नको, कारण ती विद्यार्थ्यांना झेपत नाही. झेपण्याचा विषय असेल तर ओके? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. माझ्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड्स आहेत. उद्या यादी जाहीर करणार आहे की, कोणाची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकली, यादीच देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आपण जर्मन, फ्रेंच शिकवायला तयार आहोत, मग एवढा हिंदीचा विरोध कुठून आला? दादांना राज ठाकरेंकडे पाठवले, त्यांना त्रिभाषा धोरण काय आहे, हे समजावून सांगितले. हा त्रिभाषा फॉर्म्युला उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला आहे. हा ते वाचत नसतील. तुम्हाला सरकार जास्त दिवस चालवायला मिळाले नाही, त्यामुळे तो रिपोर्ट आम्ही अंमलात आणत आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाhindiहिंदीmarathiमराठीEducationशिक्षण