लवकरच भेटू भाजपाच्या Selfie Point वर!!
By Admin | Updated: March 2, 2017 14:33 IST2017-03-02T14:33:11+5:302017-03-02T14:33:11+5:30
मनसेच्या दादरमधील पराभवानंतर बंद झालेला मुंबईतील पहिला सेल्फी पॉईंट आता भाजपा उभारणार आहे.

लवकरच भेटू भाजपाच्या Selfie Point वर!!
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मनसेच्या दादरमधील पराभवानंतर बंद झालेला मुंबईतील पहिला सेल्फी पॉईंट आता भाजपा उभारणार आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टि्वट करुन शिवाजी पार्क मैदानात सेल्फी पॉईंट उभारणार असल्याची माहिती दिली. पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक पद्धतीने हा सेल्फी पॉईंट उभारू असे शेलार यांनी सांगितले.
मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या कल्पनेतून हा सेल्फी पॉईंट आकाराला आला होता. सीएसआर फंडाचे कारण देऊन हा सेल्फी पॉईंट बंद करण्यात आला. सेल्फी पॉईंटच्या देखभालीसाठी निधी नसल्याचे कारण मनसेकडून देण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सेल्फी पॉईंटचे उदघाटन केले होते.
रंगीबेरंगी छत्र्या, फुलपाखरांच्या डिझान्सचा हा सेल्फी पॉईंट तरुणाईसह अबालवुद्धांचा आकर्षण ठरला होता. रविवारी संध्याकाळी तर इथे सेल्फी स्टीकने फोटो काढण्यासाठी जत्रा जमायची. कॉलेजला जाणा-या तरुण-तरुणींचा घोळका इथे जमायचा.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवाजी पार्कमधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंचा पराभव झाला. मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या स्वप्ना देशपांडेंचा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी पराभव केला. दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. नेहमीच या भागात शिवसेना-मनसेमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असते.
दादर शिवाजी पार्कवरील तरूणाईचे आकर्षण ठरलेला Selfie Point आता भाजपा अधिक आकर्षक पद्धतीने उभारणार !! लवकरच भेटू Selfie Point वर!!
— ashish shelar (@ShelarAshish) March 2, 2017