शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

सत्तेसाठी भाजप महाडिकांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 00:08 IST

राजू शेट्टीही दूरच; अजितराव घोरपडे दोन दिवसांत निर्णय घेणार; राजकीय हालचालींना वेग

सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर रयत विकास आघाडीचे तीन सदस्य भाजपबरोबर जाण्यास बांधील नसल्याचे राहुल महाडिक यांनी गुरुवारी जाहीर करताच भाजप नेत्यांची झोप उडाली. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला. महाडिक गटाची समजूत काढण्यात भाजप नेत्यांचा शुक्रवारचा दिवस गेला. खा. राजू शेट्टी यांनीही भाजपपासून फारकत घेतली असून, अजितराव घोरपडे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ भूमिकेत आहेत. जिल्हा परिषदेत ६० सदस्य असून, सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. भाजपकडे २५, राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, शिवसेना तीन, रयत विकास आघाडी चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन, अपक्ष एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपच्या आणि रयत विकास आघाडीच्या चार, अशा २८ जागा आपल्याकडे असल्याचा दावा केला. मात्र रयत विकास आघाडीत नानासाहेब महाडिक यांचे तीन आणि वैभव नायकवडी गटाचा एक सदस्य आहे. नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक यांनी, आमचे तीन सदस्य भाजपला पाठिंबा देण्यास बांधील नाहीत, जो पक्ष सन्मानाची वागणूक देईल, त्यांना पाठिंबा देणार आहोत, असे जाहीर करून गुरुवारी खळबळ उडवून दिली होती. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही एक सदस्य असून त्यांनीही भाजपबरोबर जाणार नाही, असे जाहीर केले आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी अद्याप पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कारण मुंबई महापालिकेतील भाजप-सेना युतीवर बाबर गटाचा निर्णय अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यात अडथळे येत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.दिवसभरात पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आमदारांच्या राजकीय हालचालींना वेग आला. महाडिक गटाची समजूत काढण्यासाठी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी धाव घेतली होती. महाडिक गटाशी चर्चा करून समजूत काढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.याबाबत माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, आमच्या गटाचे दोन सदस्य असून कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याबद्दल निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, आम्ही पराभवाचे चिंतन करीत असून, कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल काहीच निर्णय झालेला नाही.रयत विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार रद्दरयत विकास आघाडीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पेठ (ता. वाळवा) येथे शुक्रवारी होणार होता. याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी येणार होते, पण ते गैरहजर राहिल्यामुळे कार्यक्रमच रद्द करण्यात आला. यावरून खासदार शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. आघाडीच्या चार सदस्यांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सदस्याचा भाजपला पाठिंबा देण्यात गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे.भाजप-आघाडी भाजप२५रयत आघाडी ४शिवसेना३एकूण३२ राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीराष्ट्रवादी१४काँग्रेस१०शिवसेना३स्वाभिमानी संघटना१रयत आघाडी (महाडिक गट)३विकास आघाडी (घोरपडे गट)२एकूण३३