गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राजकीय कलगितुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी संभाजीनगर या नामांतराला विरोध केला होता. आता यावरून भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असून कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं गेलं पाहिजे. कोणत्याही शहराचं नामांतर करायचं असेल तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबादचं नामांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेत तुमचीच सत्ता आहे. त्या ठिकाणी ठराव करावा आणि मंत्रिमंडळाला तो देण्यात यावा," असं दरेकर म्हणाले.
कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका
By जयदीप दाभोळकर | Updated: January 3, 2021 11:36 IST
मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य
कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका
ठळक मुद्देकाही न करता केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती, दरेकरांचा आरोपयापूर्वी काँग्रेसनंही केला होता नामांतराला विरोध