शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:30 IST

Param Bir Singh Letter: महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देराम कदम यांची ठाकरे सरकारवर टीकाराज्यातील जनतेला मुर्ख समजू नये - राम कदमवाझे गँगला वाचवण्यासाठी खोटं बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या - राम कदम

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अशातच भाजप नेते राम कदम यांनीही टीका करत वाझे गँगला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे म्हटले आहे. (bjp leader ram kadam slams on thackeray govt over param bir singh letter)

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. वाझे गँगला वाचवण्यासाठी खोटं बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे सरकारने मुर्ख समजू नये, अशी टीका राम कदम यांनी केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

पवारांना किती सारवासारव करायला भाग पाडणार

खरंच... स्वतःची चामडी वाचवण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात?, थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा. अनिल देशमुखांना वाचवायचचं, असा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलेला दिसतोय. १५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है, असे सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. 

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून २,३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की, मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगRam Kadamराम कदमBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण