शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 12:48 IST

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजू शिंदे यांनी त्यांच्या भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू शिंदे यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. 

गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनी राजू शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी सुरू केली. तसेच, राजू शिंदे यांच्याबाबत भाजपकडून तब्बल आठ बैठका झाल्या, पण तरीही राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते.

राजू शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे की, "आता माघार नाही..! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये  प्रवेश करत आहोत. आपण जी मला साथ दिली यापुढेही देताल हीच इच्छा." दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत. त्यावर राजू शिंदे यांचा उल्लेख शिवसेना ठाकरे गटाचे नेते असा करण्यात आला आहे. राजू शिंदे यांच्या राजकीय भूमिकेचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

सावे, शिरसाटांना बसणार धक्का?राजू शिंदे यांनी भाजपला रामराम केल्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना धक्का बसला आहे. पूर्व मधील निवडणूक ही अटीतटीची होत असते. तसेच, पश्चिममध्ये आता शिरसाट यांना त्यांच्याच जुन्या पक्षाकडून तगडा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते. 

ठाकरे गटामधील इच्छुकांमध्ये नाराजीठाकरे गटामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन कांबळे आणि लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा इच्छुक आहेत. तसेच, माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. यामुळे राजू शिंदे हे उद्धव ठाकरे येत असल्याने इच्छुकामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे