शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pravin Darekar Coronavirus Positive : भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 12:17 IST

Pravin Darekar Coronavirus : यापूर्वीही राज्यातील काही नेत्यांना झाली होती कोरोनाची लागण.

Pravin Darekar Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. 

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी," असं दरेकर यांनी म्हटलंय.  यापूर्वी काही नेत्यांना कोरोनाची लागणराज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena Mp Arvind Sawant), राजन विचारे (Rajan Vichare) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची (Tested Coronavirus Positive) माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी केलं होतं.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस