शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानं विधान परिषद नाकारली; पंकजा मुंडे मध्यरात्री ट्विट करून म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 10:38 IST

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; माजी मंत्र्यांना उमेदवारी नाही

मुंबई: विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. काल दुपारी भाजपानं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. मात्र पंकजा मुंडेंनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मध्यरात्री एकच्या सुमारास पंकजा मुंडेंनी यावर ट्विट करून भाष्य केलं. 'आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!,' असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  तत्पूर्वी एकनाथ खडसेंनी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विधानपरिषदेसाठी माझं, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस दिल्ली दरबारी झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, आमच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं समजलं, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली. गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आल्याबद्दलही खडसेंनी नाराजी बोलून दाखवली. पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी पक्षाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.  एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारण्यात आल्यानं त्यांना राजकीय पुनर्वसनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खडसे हे फडणवीस यांचे विरोधक मानले जातात, तर पंकजा मुंडे यांनीही अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर मध्यंतरी टीका केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडे हे कधीही त्यांचे निकटवर्ती नव्हते. मात्र बावनकुळे हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात. या चौघांना संधी द्यावी की विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत पडळकर, मोहिते पाटील यांना संधी देऊन अन्य दोन जागांसाठी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय पक्षाने निवडला. प्रस्थापित नेत्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने मात्र खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी द्यावी असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडे धरला होता. मात्र पक्षनेतृत्वाने तो अमान्य केला अशी माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस विरोधकांना न मिळालेली उमेदवारी आणि जाहीर झालेल्या नावांमध्ये फडणवीस यांच्या निकटवर्तीयांचा असलेला समावेश यामुळे उमेदवारी वाटपात फडणवीसांचा शब्द चालला असे म्हटले जाते. बावनकुळे यांच्याबाबत वरून नकार असल्याने फडणवीस यांनी दटके यांचे नाव सुचवले अशीही माहिती आहे. दटके हे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व फडणवीस या दोघांचेही निकटवर्ती आहेत.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेEknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinod Tawdeविनोद तावडेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक