शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

नाराज पंकजा मुंडे 'माधवबरा' मार्गानं जाणार; उद्या मोठी घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 16:00 IST

पंकजा मुंडेंकडून भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

बीड: भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरुन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी समुदायाला एकत्र आणत 'माधव'चा प्रयोग केला होता. आता पंकजा या समुदायांसोबतच बंजारा आणि राजपूत यांचीदेखील मोट बांधण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतं. भाजपावर दबाव आणण्यासाठी पंकजा मुंडे 'माधवबरा' (माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत) या समुदायांना एकत्र आणू शकतात. उद्या गोपीनाथ गडावरुन याबद्दलची घोषणा होऊ शकते. 'एबीपी माझा'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.उद्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र पंकजा मुंडे यांचं काही ठरलं नसून त्या पक्षातच राहतील, असा विश्वास त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काल मुंबईत भाजपचे आणखी एक नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यामुळे गोपीनाथ गडावर गुरुवारी होणाऱ्या मेळाव्यात त्या कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काही संदेश आहे का, याचा कानोसा घेतला असता काही कार्यकर्त्यांनी त्या पक्षांतर करणार नाहीत, असा असा ठाम विश्वास व्यक्त केला.पंकजा मुंडे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजकारण ढवळून निघालं आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांनीही पक्षांतर करणं रक्तात नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही एकनाथ खडसे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांच्या चाललेल्या बैठका, संवाद यामुळे पंकजा मुंडे या एकनाथ खडसे यांच्यासह पक्षांतर करण्याच्या चर्चेनं जोर धरला. याविषयी औरंगाबाद आणि बीडमधील त्यांच्या जवळच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला असता पंकजा या पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्या माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत समाजाची मोट बांधून एका संघटनेची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसे