शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 16:22 IST

पंकजा मुंडेंकडून संघर्षाची हाक राज्य नेतृत्त्वावर हल्लाबोल

बीड: गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून काहीशा दूर असणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी अखेर त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्त्वावर वारंवार शरसंधान साधलं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत भाजपाचा एकेक आमदार निवडून येईल यासाठी प्रचार केला, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातून पंकजांनी समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण करुन दिली. निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एकेक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे त्या पक्ष सोडतील, अशी चर्चा होती. मात्र आपण पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्षावर कोणाचीही मालकी नसल्याचं म्हणत राज्य नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष टीका केली. पक्ष ही प्रक्रिया असते. पक्षावर कुणाचीही मालकी नसते. अटलजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा वाहिली आहे. पक्ष हा कोणाही एका व्यक्तीचा नाही, अशा शब्दांमध्ये पंकजांनी आक्रमक भाषण केलं.  पंकजा मुंडे बंडखोरी करुन वेगळा मार्ग धरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावरही पंकजांनी भाष्य केलं. मी का बंड करेन, मी कुणाविरुद्ध बंड करू, असे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. पद मिळवण्यासाठी पंकजा मुंडे दबाव आणत आहेत, असं बोललं जातं. मला पद मिळू नये त्यासाठी अशा चर्चा घडवून काही कारस्थान रचलं जात आहे का, असा प्रश्न मला पडतो, असंदेखील त्या म्हणाल्या. आपण कमजोर व्हायचं नाही, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मी प्रत्येक क्षणी सेवा केली. पराभव झाल्यानंतरही प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिले. सत्तास्थापनेसाठी जे काही करता येईल ते केलं, असं पंकजा म्हणाल्या. एक मैं ही हूं, समझी नहीं खुद को आज तक, एक दुनिया ही है, की न जाने मुझे क्या क्या समझ रही है, असा शेर म्हणत त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGopinath Mundeगोपीनाथ मुंडे